शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अनियंत्रित संघटनांमुळे भारताचा पाकिस्तान होईल : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 20:16 IST

सांगली : धार्मिक राजकारणाला आमचा अजिबात विरोध नाही, मात्र अशा संघटनांवर सरकारचे नियंत्रण हवे. ते सुटले, तर आपलीही पाकिस्तानसारखीच अवस्था होऊन जाईल, असे मत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर

ठळक मुद्देधार्मिक राजकारणाला विरोध नाही अनियंत्रित संघटना अतिरेकी होऊ पाहात आहेतमाझा कोणीच धनी नव्हता. भिडेंमुळे तो मला मिळाला, अशी उपहासात्मक टीका

सांगली : धार्मिक राजकारणाला आमचा अजिबात विरोध नाही, मात्र अशा संघटनांवर सरकारचे नियंत्रण हवे. ते सुटले, तर आपलीही पाकिस्तानसारखीच अवस्था होऊन जाईल, असे मत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

ते म्हणाले की, देशातील धार्मिक विचाराच्या लोकांना डावलून चालणार नाही, हे आम्ही जाणून आहोत. त्या विचाराचे राजकारण आणि संघटना अस्तित्वात असल्या तरी, त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम सरकारचे आहे. अनियंत्रित संघटना अतिरेकी होऊ पाहात आहेत. पाकिस्तानची आज जी कोंडी झाली आहे, त्याचे मूळही या अनियंत्रित संघटनांमध्येच आहे. हाफिज सईदला अटक करण्याचे धाडस त्याठिकाणचे सरकार दाखवू शकत नाही.

महाराष्टÑातही आज संभाजी भिडे यांना अटक करण्याचे धाडस ते याच कारणास्तव दाखवत नाहीत. भविष्यात ही देशासाठी आणि राष्टÑीय स्वयंसेवक संघासाठीही धोक्याची घंटा आहे. भाजप लोकनियंत्रित आहे, तर राष्टÑीय स्वयंसेवक संघ एका मर्यादेबाहेर जात नाही. अशावेळी काही हिंदुत्ववादी संघटना अनियंत्रित होऊन सारे ताब्यात घेऊ पाहात आहेत. अशा संघटनांवर कारवाई केल्यास निवडणुकीमध्ये फटका बसेल, अशी भीती पाकिस्तानप्रमाणे भारतातील सरकारलाही वाटते. त्यामुळे ते कारवाई करायला तयार होत नाहीत.

कोरेगाव व परिसरातील पाच गावांमध्ये कुठेही दंगल घडली नाही. कोरेगावकडे येणाºया दोन मार्गांवर हा प्रकार घडला. गाड्या पेटविल्यानंतर त्यामागील सूत्रधार पळून आपापल्या गावी गेले. मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्या अटकेची आमची मागणी योग्यच होती. गुन्हा दाखल केल्यानंतरही त्यांना अटक होत नाही, याला काय म्हणावे? शासनालाच त्यांना अटक होऊ द्यायची नाही, असे दिसते. बा'शक्तींचा मुद्दा खराच आहे. गावाव्यतिरिक्त बाहेरून आलेल्या शक्तींमुळेच दंगल भडकली आहे, असा आमचाही आरोप आहेच.

सरकारची दुटप्पी भूमिकाफेसबुक आणि ट्विटरवर एखाद्याने आक्षेपार्ह लिखाण सरकारविरोधात केले की त्यावर लगेच कारवाई केली जाते, मात्र काही कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश बापट यांच्या खुनाची धमकी देऊनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. फेसबुकवर ही धमकी त्यांनी दिली होती. सरकारचा हा दुटप्पीपणा नाही, तर दुसरे काय आहे, असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला.

न्यायाधीशांप्रमाणे पोलिस अधिकाऱ्यानीही व्यक्त व्हावेन्यायाधीशांची तक्रार सरन्यायाधीशांबद्दलच होती. त्याचा सरकारशी काहीही संबंध नाही, मात्र या प्रकरणाची गंभीर दखल सरकारने घेतली पाहिजे. पोलिस अधिकाºयांना सरकारच्या आदेशाप्रमाणेच वागावे लागते. या यंत्रणेचीही घुसमट सुरू आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी ज्यापद्धतीने ही घुसमट जनतेसमोर मांडली, त्यापद्धतीने वरिष्ठ पोलिस अधिकाºयांनीही त्यांची घुसमट मांडावी, असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले.

बरं झालं मला धनी मिळाला!माझ्या टीकेमागचा बोलवता धनी वेगळा आहे, असे संभाजी भिडे यांना वाटत असेल तर, चांगले आहे. इतके दिवस माझा कोणीच धनी नव्हता. भिडेंमुळे तो मला मिळाला, अशी उपहासात्मक टीका आंबेडकर यांनी केली.मराठा विरुद्ध दलित असा रंग जाणीवपूर्वक शौर्यदिनापूर्वी आलुतेदार आणि बलुतेदार सर्वजण आम्ही एकत्रितच संवाद साधत होतो. माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, बी. जी. कोळसे-पाटील यांच्यासोबत आम्ही संवाद कार्यक्रम हाती घेतला होता. इतिहासातील घटनांना उजाळा देताना भांडण, मतभेद होणार नाही, याची दक्षताही घेतली होती. दरवर्षी ४० ते ५० हजाराच्या संख्येने एकत्रित येणाºया लोकांची संख्या यंदा दोनशे वर्षपूर्तीमुळे साडेतीन लाखांवर गेली. यामध्ये आलुतेदार आणि बलुतेदारांचीही संख्या मोठी होती. तरीही घटनेनंतर समाज माध्यमांद्वारे दलित-मराठा असा रंग

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPakistanपाकिस्तान